महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात विविध पदांची भरती ; वेतन 50,000 पर्यंत
MAHA Security Recruitment 2024 महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 जानेवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 17
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सह संचालक- 01
शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस बलातून सहा. पोलीस आयुक्त / पोलीस उप अधिक्षक (सशस्त्र / निशस्त्र) या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी. किमान शैक्षणिक अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.
2) सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी -01
शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस बलातून सहा. पोलीस आयुक्त / पोलीस उप अधिक्षक (सशस्त्र / निशस्त्र) या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी. किमान शैक्षणिक अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.
3) सेवानिवृत्त ACP -05
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.
4) सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक – 10
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जानेवारी 2024 रोजी 61 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार : 45,000/- रुपये ते 50,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 31 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – 400005.
मुलाखतीचे ठिकाण : पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – 400005.
अधिकृत संकेतस्थळ : www.mahasecurity.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा