⁠  ⁠

Mahaforest महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत विविध पदांच्या एकूण ०४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2021 आहे.. या संदर्भातील अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघावी.

एकूण जागा : ०४

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) विभागीय वन अधिकारी/ Departmental Forest Officer ०१
शैक्षणिक पात्रता : वन विभागाच्या Portal मध्ये e-Green Watch संबंधातील माहिती, Polygon फोटो, नकाशे इत्यादी Upload करण्याकरिता संगणकीय प्रणालीचे तसेच GIS व GPS बाबतचे आवश्यक ज्ञान व त्याप्रणालीवर काम केल्याचा अनुभव.

२) विभागीय वन अधिकारी/ Departmental Forest Officer ०१
शैक्षणिक पात्रता : वन संवर्धन कायदा १९८० चे संपूर्ण ज्ञान, भूमी अभिलेख संबंधी माहिती तसेच वृत्तस्तरीय कार्यालय किंवा प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील वन संवर्धन कायद्याबाबतची प्रकरणे हाताळण्याचा कमीत-कमी १ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

३) सहाय्यक वनसंरक्षक/ Assistant Forester ०१
शैक्षणिक पात्रता : सहाय्यक वनसंरक्षक या पदावर क्षेत्रीयस्तरीय कामाचा कमीत-कमी ५ वर्षांचा अनुभव

४) वनक्षेत्र सर्वेक्षक/ Forest Surveyor ०१
शैक्षणिक पात्रता : वनक्षेत्र सर्वेक्षक या पदावर वनविभागाच्या क्षेत्रीयस्तरावरील कामाचा कमीत-कमी ५ वर्षांचा अनुभव.

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : शासकीय नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जून 2021 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य, नागपूर वनभवन, तळ मजला, बी-विंग, रामगिरी रोड, लाईन्स, नागपूर – ४४०००१.

अधिकृत संकेतस्थळ : mahaforest.gov.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Share This Article