वन विभाग नागपूर (Mahaforest Recruitment 2021) येथे विविध पदांच्या १४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०२१ आहे. Van Vibhag Nagpur Recruitment 2021
एकूण जागा : १४
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१ जीवशास्त्रज्ञ- ०१
शैक्षणिक पात्रता : वन्यजीवन विज्ञान / प्राणीशास्त्र / वानिकी/ वनस्पतिशास्त्र /पर्यावरणशास्त्रा मध्ये पदव्युत्तर किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण व पीएचडी. ०२) ०३ वर्षे अनुभव
२ कनिष्ठ संशोधन सहाय्यक- ०१
शैक्षणिक पात्रता : वन्यजीव विज्ञान / प्राणीशास्त्र / वानिकी / वनस्पतिशास्त्र / पर्यावरणशास्त्र /वन्यजीवन विज्ञान मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी किमान ६०% गुणांसह. ०२) ०१ वर्षे अनुभव
३ पशुवैद्यकीय अधिकारी- ०१
शैक्षणिक पात्रता : स्नातकोत्तरमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी. वन्यजीव विषयासह पदव्युत्तर पदवी (एम.व्ही.एस.सी) ला प्राधान्य देण्यात येईल. ०२) ०३ वर्षे अनुभव
४ निसर्ग पर्यटन व्यवस्थापक-०१
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर, हॉस्पिटलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट / पर्यटन व्यवस्थापन यात पदविका
५ कायदा अधिकारी -०१
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी तसेच बार कौन्सिल ऑफ इंडियाने घेतलेली अखिल भारतीय बार परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि त्यांनी ॲडव्होकेट्स अॅक्टनुसार राज्य बार कौन्सिलमध्ये वकिल म्हणून नोंदणी केलेली पाहिजे. ०२) मान्यता प्राप्त विद्यापीठातून कायद्याचा पदवीधर व सनदधारक. ०३) जिल्हा न्यायाधिश, सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश, सेवानिवृत्त प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी किंवा विधी व न्याय विभागामधुन सेवानिवृत्त झालेले. ०४) ०२) अनुभव
६ उपजीविका तज्ञ- ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) सामाजिक कार्य शाखेत पदव्युत्तर पदवी (MSW) / ग्रामीण व्यवस्थापनात/ कृषी व्यवस्थापनात एमबीए. ग्रामीण क्षेत्रात उपजिवीका तज्ञ म्हणुन किमान २ वर्षाचा अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर व उपजिवीका तज्ञ या कामाचा कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव. ०२) अनुभव
७ डेटा एंट्री ऑपरेटर- ०२
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी टंकलेखन वेग-इंग्रजी -४० आणि मराठी – ३० (मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक) MSCIT किंवा तत्सम संगणक परीक्षा पास.
८ कार्यालय सहाय्यक- ०३
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवीधर, टंकलेखन वेग इंग्रजी -४० श.प्र.मी., मराठी -३० श.प्र.मी. (मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक). ०२) अनुभव
९ सर्वेक्षण सहाय्यक- ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवीधर, टंकलेखन वेग | इंग्रजी -४० श.प्र.मी., मराठी -३० श.प्र.मी. सर्वेक्षण / जमीन विषयक / जीआयएस मध्ये अनुभव. ०२) अनुभव
NAFCC (प्रकल्प) Project
१० कनिष्ठ संशोधन सहाय्यक- ०१
शैक्षणिक पात्रता : सामाजिक कार्य शाखेत पदव्युत्तर पदवी (MSW) / ग्रामीण व्यवस्थापनात/ कृषी व्यवस्थापनात एमबीए. ग्रामीण क्षेत्रात उपजिवीका तज्ञ म्हणुन किमान २ वर्षाचा अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर व उपजिवीका तज्ञ या कामाचा कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव.
११ डेटा एंट्री ऑपरेटर- ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेची पदवी टंकलेखन वेग-इंग्रजी -४० आणि मराठी – ३० (मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक) MSCIT किंवा तत्सम संगणक परीक्षा पास. ०२) अनुभव
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) :
१) जीवशास्त्रज्ञ -30,000/-
२) कनिष्ठ संशोधन सहाय्यक – 25,000/-
३) पशुवैद्यकीय अधिकारी -50,000/-
४) निसर्ग पर्यटन व्यवस्थापक -20,000/-
५) कायदा अधिकारी -50,000/-
६) उपजीविका तज्ञ -30,000/-
७) डेटा एंट्री ऑपरेटर – 12,500/-
८) कार्यालय सहाय्यक – 10,000/-
९) सर्वेक्षण सहाय्यक – 15,000/-
१०) कनिष्ठ संशोधन सहाय्यक – 30,000/-
११) डेटा एंट्री ऑपरेटर – 15,000/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2021
अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा