Maharashtra Forest Department Bharti 2025 : महाराष्ट्र वनविभागात नोकरीची इच्छा असलेल्यांसाठी सुवर्णसंधी चालून आलीय. महाराष्ट्र शासन, उपवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, वन्यजीव विभागाद्वारे भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करु शकतात.
रिक्त पदाचे नाव
प्रकल्प सल्लागार, कनिष्ठ संशोधन जीवशास्त्रज्ञ, वन्यजीव जीवशास्त्रज्ञ, वरिष्ठ सल्लागार, कनिष्ठ संशोधन जीवशास्त्रज्ञ अशा विविध पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता :
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित क्षेत्रात पदवी प्राप्त केलेली असावी. ११ महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाणार आहे. प्रकल्प सल्लागार पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने M.Sc Life Science मध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. ज्युनिअर रिसर्च बायोलॉजिस्ट पदासाठी उमेदवाराने संबंधित क्षेत्रात पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
एकूण ५ रिक्त जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. अकोला, अमरावती येथे भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ एप्रिल २०२५ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज ईमेल किंवा ऑफलाइन पद्धतीने पाठवावे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना १५००० ते ३५००० रुपये पगार मिळणार आहे.
या नोकरीसाठी मुलाखत ११ एप्रिल रोजी होणार आहे. त्यासाठी तुम्हाला सकाळी ११ वाजता विभागीय वनअधिकारी, मेळघाट वन्यजीव विभाग, परतवाडा यांचे कार्यालय टिंबर डेपो रोड, परतवाडा, अचलपूर येथे उपस्थित राहायचे आहे.
या नोकरीसाठी तुम्ही [email protected]/ [email protected] येथे पाठवायचा आहे.