⁠
Jobs

MPSC च्या उमेदवारांसाठी खुशखबर! नवा अभ्यासक्रमासंदर्भात राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत दरवर्षी हजारो पदांसाठी भरती घेतली जाते. त्यानुसार लाखो विद्यार्थी दिवस रात्र अभ्यास करतात असता. दरम्यान, MPSC विद्यर्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. एमपीएससीचा नवा पॅटर्न २०२५ पासूनच लागू करण्यात येणार आहे. एमपीएससीचे नवे नियम 2025 पासून लागू होणार. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यभरातील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. 

मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर इतरही मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले आणि हे नियम 2025 पासून लागू करण्याची विनंती केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे.

राज्यात UPSCच्या धर्तीवर MPSC परीक्षा घेण्याचा नवा पॅटर्न 2025 पासून लागू करण्याच्या मागणीसाठी पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांची फोनवरुन संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय कळवण्यात येईल आश्वासन दिले. त्यानंतर काही तासातच शिंदे – फडणवीस सरकारने या विद्यर्थ्यांना मोठा दिलासा दिला.

एममपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू होईल, असा निर्णय महाराष्ट्र सरकारच्यावतीने घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यभरातील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. थोड्यात वेळात याबाबत अधिकृत घोषणा होईल. आता सरकारच्या अधिकृत घोषणेनंतर पुण्यातील विद्यार्थी हे आंदोलन मागे घेण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button