⁠
Jobs

तरुणांसाठी खुशखबर! महाराष्ट्र जलसंपदा विभागात लवकरच मेगाभरती होणार

महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागात नोकरीची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. जलसंपदा विभागात लवकरच एकूण 16,185 जागांसाठी नोकर भरती होण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून जलसंपदात नोकरीचे दार बंद आहे अशातच आता पुन्हा पद भरती होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने याविषयीची अधिकृत माहिती दिली नसली तरी, जलसंपदा विभागात पद भरती होण्याची चर्चा रंगली आहे.

या भरतीसाठीची 15 ऑगस्ट 2023 रोजीपूर्वी अधिसूचना जारी होऊ शकते. या खात्यातील नोकर भरतीची प्रक्रिया लवकरच होईल.
जलसंपदा विभागात गट क संवर्गात सरळसेवा पध्दतीने भरती होईल. एकूण 8,014 जागा सरळसेवा पद्धतीने भरण्यात येतील. तर पदोन्नतीने 3,163 जागांची भरती करण्यात येणार आहे. एकूण 16,185 जागांसाठी नोकर भरती करण्यात येणार आहे.

गट ड पदासाठी भरती
गट ड संवर्गातील जागा सरळसेवा पद्धतीने भरण्यात येतील. एकूण 4,702 जागा थेट पद्धतीने भरता येईल. 306 जागा पदोन्नतीने भरता येतील. एकूण 5,008 पदे भरण्यात येणार आहे. गट क आणि ड संवर्गातील मिळून सुमारे 16,185 जागांसाठी मेगा नोकर भरती करण्यात येईल.

कधी होईल पद भरती?
जलसंपदा विभागात नोकर भरती कधी होणार याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. भरतीची अधिसूचना अजून जाहीर करण्यात आलेली नाही. पण 15 ऑगस्टपूर्वीच भरती प्रक्रिया राबविण्यात येऊ शकते, अशी शक्यता आहे.

Related Articles

Back to top button