Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2022 : मीरा भाईंदर महानगरपालिकामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक २७ व २८ डिसेंबर २०२२ आहे.
एकूण जागा : २३ जागा
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ) – ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी (स्त्री व प्रसूतीरोग शास्त्र) किंवा समकक्ष पदवी. तथापी, पदव्युत्तर पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद पदव्युतर पदविकाधारकामधून (DCH) भरण्यात येईल. ०२) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
२) वैद्यकीय अधिकारी – ०९
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय पदवी (एम.बी.बी.एस) ०२) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अधिनियम अंतर्गत नोंदणी आवश्यक. ०३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
३) औषध निर्माण अधिकारी– ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C) उत्तीर्ण. ०२) सांविधानिक विद्यापीठातून बी. फार्म पदवी उत्तीर्ण. ०३) महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र फार्मसी अॅक्ट, १९४८ (८ ऑफ १९४८) नुसार वैध नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक, ०४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
४) प्रसविका – १२
शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C) उत्तीर्ण. ०२) शासन मान्यता प्राप्त संस्थेचा ए.एन.एम अभ्यासक्रम पूर्ण. ०३) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक. ०४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
वेतन :
वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ) -८०,०००/-
वैद्यकीय अधिकारी – ७०,०००/-
औषध निर्माण अधिकारी- २०,०००/-
प्रसविका – २०,०००/-
नोकरी ठिकाण : मिरा-भाईंदर, ठाणे (महाराष्ट्र)
निवड पद्धती : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, नगरभवन, तिसरा मजला, मांडली तलावजवळ, भाईंदर (प), जि.ठाणे – ४०११०१.
अधिकृत संकेतस्थळ : www.mbmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा