क्रीडाक्षेत्रातील प्राविण्य प्राप्त झाल्यानंतर सरकार नोकरीसाठी दारे अधिक खुली होतात. हेच मोहम्मद सिराज यांच्या विषयी झाले.मोहम्मद हे हैदराबादमधील ऑटो रिक्षाचालकाचा मुलगा. त्यांना लहानपणापासूनच खेळाची आवड होती. त्यांनी २०१५ मध्ये पहिल्यांदा गोलंदाजी केली आणि २०१७ मध्ये त्याला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये २.६ कोटीचा करार मिळाला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला करारबद्ध केले. महिन्याभरात त्याने भारताकडून ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पदार्पण केले. भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाचा देखील सदस्य होता. आतापर्यंत त्यांनी २९ कसोटी, ४४ वन डे आणि १६ ट्वेंटी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना १६३ आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी ( ६-१५) व वन डे ( ६-२१) फॉरमॅटमध्ये सहा विकेट्स ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे.
त्यांच्या या कार्याची दखल शासनाने घेतली. मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी भारताचा जलदगती गोलंदाज सिराजला प्रतिष्ठित गट-१ सरकारी नोकरी मिळेल, असे याआधी जाहीर केले होते. भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद सिराज याने शुक्रवारी तेलंगणाचे पोलीस महासंचालक (डीजीपी) यांना अहवाल दिल्यानंतर अधिकृतपणे पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) म्हणून पदभार स्वीकारला.