⁠  ⁠

तयारीला लागा ! MPSC चे २०२२ मधील स्पर्धा परीक्षांचं वेळापत्रक नोव्हेंबर महिन्यात

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

राज्याचे उपमुख्यंत्री अजित पवार यांनी राज्याच्या वेगवेगळ्या विभागातील रिक्त पदांची माहिती 30 सप्टेंबरपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडं द्यावी, अशा सूचना विभागांना देण्यात आल्याचं सांगितलं होतं. सरकारच्या या आदेशानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगदेखील कामाला लागला आहे.

प्रलंबित निकाल 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन एमपीएससीकडून आखण्यात आलं असून मागणीपत्र प्राप्त झाल्यास येत्या नोव्हेंबर महिन्यात पुढील वर्षी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक एमपीएससी जाहीर करणार आहे.  परिपत्रक जारी करत एमपीएसी आयोगाने तशी माहिती दिली आहे.

ऑक्टोबर महिन्यात पुढील वर्षाचं वेळापत्रक
एमपीएसीकडून ऑक्टोबर महिन्यात पुढील वर्षाचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. तसेच प्रलंबित निकालदेखील 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे एमपीएससीचे नियोजन आहे. विशेष म्हणजे एमपीएससीने परिपत्रक काढत ही माहिती दिली आहे.

30 सप्टेंबरपूर्वी MPSC ला माहिती द्या
अजित पवार यांनी वेगवेगळ्या रिक्त जागा भरण्यासंदर्भात आज मुंबई सविस्तर भाष्य केलं. “मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. वेगवेगळ्या विभागाच्या जागा भरायच्या आहेत. त्या जागांची माहिती MPSC ला कळवायची आहे. 30 सप्टेंबरपर्यंत सर्व विभागांना सांगितलं आहे. जागांची माहिती द्या, अशा सूचना दिल्या आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत जागा येतील. आरक्षण आणि इतर नियमांचं पालन करुन याद्या द्याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. विभागांकडून याद्या आल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला माहिती दिली जाईल. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहिराती प्रसिद्ध केली जाईल, असं अजित पवार म्हणाले होते.

Share This Article