मुंबई – एमपीएससीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. खुल्या प्रवर्गातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वर्यामर्यादा वाढवण्यात आली आहे.
राजपत्रित अधिकाऱ्यांची वर्यामर्यादा 33 वरुन 38 वर्ष करण्यात आली आहे. तर पीएसआयची वर्यामर्यादा 28 वरुन 33 वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच पोलिस शिपाई पदाची वयोमर्यादा 25 वरुन 28 वर्ष करण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातून परीक्षा देणाऱ्यांसाठी कमी संधी मिळत होती. त्यामुळे वर्यामर्यादा वाढवण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. अखेर खुल्या प्रर्वगाची वयोमर्यादा वाढवण्याच्या निर्णयावर राज्य मंत्रिमंडाळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. दरम्यान, दलित विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढवण्याचीही मागणी दलित संघटनांनी केली आहे.