⁠  ⁠

MPSC : एमपीएससीचा मोठा निर्णय, वयोमर्यादेत कितीही वेळा परीक्षा देता येणार, मर्यादित संधींचा निर्णय रद्द

Rajat Bhole
By Rajat Bhole 2 Min Read
2 Min Read

MPSC अंतर्गत येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेसह इतर सर्वच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवरांसाठी आयोगाने एक मोठी बातमी आणि आनंदाची बातमी जाहीर केली आहे. या नवीन निर्याणयानुसार आता एमपीएससीच्या उमेदवारांना परीक्षेसाठी विहित केलेल्या वयोमर्यादेत कितीही वेळा परीक्षा देता येणार आहे. संधीची मर्यादा (MPSC Attempt) आता एमपीएसीकडून हटवण्यात आली आहे. याचा फायदा नव्यानेच अभ्यास सुरु केलेल्या उमेदवारांना सगळ्यात जास्त होणार आहे. यासंदर्भातील घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती एमपीएससीच्या ट्विटवरून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोरचं संधीचं एक मोठं कोडं आता सुटलं आहे. आधी संधींच्या मर्यादेमुळे अनेकांना आपल्या ध्येयापासून मुकावं लागत होतं.

या निर्णयामूळे फायदा कोणाला होणार?
आधी संधींच्या मर्यादा असल्यामुळे दिलेल्या संधींमध्येच विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मिळत होती. त्यामुळे अनेकांना मर्यादा संपल्यावर परीक्षा देत येत नव्हते. आता मात्र तसे होणार नाही. काही वेळेस अपयश आले तरी वयोमर्यादा आहे तोपर्यंत पुन्हा पुन्हा परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे ही बातमी स्पर्धापरीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्साह नक्कीच वाढवणारी आहे. या निर्णयाचे विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.

5106 page 0001 1

कोरोनाकाळात अनेकवेळा एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचेही मोठं नुकसान झालं आहे. यावेळी अनेकांना परीक्षा देता आल्या नव्हत्या. तर अनेक विद्यार्थ्यांच्या नियुक्त्याही रखडल्या होत्या. यासाठी राज्यभर विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसून आले. आता गेल्या दोन वर्षातलं उमेदवारांचं नुकसान भरून काढण्यासाठी एमपीएससी आयोगाकडून तातडीने विविध पाऊलं उचलली जात आहेत.

या बाबतची पूर्ण घोषणा :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३० डिसेंबर, २०२० व दिनांक २७ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या घोषणांव्दारे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला, “आयोगामार्फत घेण्यात येणा-या विविध स्पर्धा परीक्षांस बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न/ संधीची संख्या मर्यादित करण्याबाबतचा आयोगाचा निर्णय” या घोषणेव्दारे रद्द करण्यात येत आहे.

त्याअनुषंगाने ज्या त्या प्रवर्गातील / वर्गवारीतील उमेदवारांना वयोमर्यादेच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून संधी अनुज्ञेय राहतील

TAGGED: ,
Share This Article