⁠  ⁠

MPSC परीक्षेविषयी संपूर्ण माहिती

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 7 Min Read
7 Min Read

एमपीएससी म्हणजे काय? (MPSC exam)

एमपीएससी (MPSC) म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग. एमपीएससी हि संस्था भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 अन्वये संविधानाच्या कलम 320 नुसार नियुक्त केलेले कार्य आणि कर्तव्य पूर्ण करण्यासाठी स्थापन केली आहे. एमपीएससी आयोगामार्फत विविध सरकारी पदासाठी उमेदवारांची शिफारस केली जाते आणि आयोगाकडून भरती नियम तयार करणे, पदोन्नती, बदल्या आणि अनुशासनात्मक कार्यवाही इ. बाबींवर सरकारला सल्ला दिला जातो.

Contents
एमपीएससी म्हणजे काय? (MPSC exam)एमपीएससी अभ्यासक्रम MPSC syllabus 2022 in Marathiएमपीएससी राज्यसेवा अभ्यासक्रम MPSC Rajyaseva Syllabus-एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा स्वरूप पेपर 1-एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 1 अभ्यासक्रम MPSC prelims syllabus (200 मार्क)-एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा स्वरूप पेपर 2-एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 2 अभ्यासक्रम MPSC prelims syllabus (200 मार्क)एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा MPSC Rajyaseva Mains Syllabusएमपीएससी PSI/STI/ASO अभ्यासक्रम MPSC PSI/STI/ASO Syllabus (Combine Exam)एमपीएससी सयुंक्त पूर्व परीक्षेचे स्वरूप (MPSC Combined Exam)MPSC PSI/STI/ASO Pre Syllabusएमपीएससी सयुंक्त मुख्य परीक्षा अभ्यासक्रम MPSC PSI/STI/ASO Mains Exam SyllabusMPSC साठी लागणारे शिक्षण / पात्रता?MPSC साठी लागणारे शिक्षण / पात्रता?MPSC मार्फत घेतल्या विविध जाणाऱ्या परीक्षा? (MPSC Exams)MPSC  पदांची माहिती? (MPSC Post List in Marathi)MPSC Exam Notification 2022

एमपीएससी अभ्यासक्रम MPSC syllabus 2022 in Marathi

एमपीएससी मार्फत विविध भरती प्रक्रिया राबवण्यात येतात आणि एमपीएससी आयोगामार्फत खालील अनेक सेवांकरता परीक्षा घेतल्या जातात. परंतु MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या पुढील मुख्य ३ परीक्षेच्या अभ्यासक्रमाविषयी आज आपण जाणून घेऊ. 

एमपीएससी राज्यसेवा अभ्यासक्रम MPSC Rajyaseva Syllabus-

एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा स्वरूप पेपर 1-

पेपर 1 (Compulsory)
मार्क 200
राज्यसेवा पूर्व परीक्षेचा वेळ 2 तास 
माध्यम मराठी आणि इंग्रजी 
परीक्षेचं स्वरूपऑब्जेक्टिव्ह 

एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 1 अभ्यासक्रम MPSC prelims syllabus (200 मार्क)-

 • राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या MPSC चालू घडामोडी 
 • भारताचा इतिहास (महाराष्ट्राचा संदर्भ) आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ
 • महाराष्ट्राचा भौतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल, महाराष्ट्र, भारत आणि जागतिक भूगोल
 • महाराष्ट्र आणि भारत – राज्यव्यवस्था आणि शासन – राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, शहरी शासन, सार्वजनिक धोरण, अधिकार समस्या इ.
 • आर्थिक आणि सामाजिक विकास – शाश्वत विकास, गरिबी, समावेश, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इ.
 • पर्यावरणशास्त्र, जैव-विविधता आणि हवामान बदलावरील समस्या
 • सामान्य विज्ञान

एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा स्वरूप पेपर 2-

पेपर 2 (Qualifying)
मार्क 200
राज्यसेवा पूर्व परीक्षेचा वेळ 2 तास 
माध्यम मराठी आणि इंग्रजी 
परीक्षेचं स्वरूपऑब्जेक्टिव्ह 

एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 2 अभ्यासक्रम MPSC prelims syllabus (200 मार्क)

 • आकलन प्रश्न
 • संवाद कौशल्यांसह परस्पर कौशल्ये
 • तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता
 • निर्णय – घेणे आणि समस्या – सोडवणे
 • सामान्य मानसिक क्षमता
 • मूलभूत संख्या, Data Interpretation (इयत्ता १० वी, सोबत संलग्न अभ्रासक्रम)
 • मराठी आणि इंग्रजी भाषेचे आकलन कौशल्य (इयत्ता १० आणि १२ वी, सोबत संलग्न अभ्रासक्रम)

नोट- पेपर २ हा Qualifying असून यात Qualify होण्यासाठी किमान 33% गुण मिळविणे आवश्यक आहे. जर पेपर 2 मध्ये 33% गुण मिळाले तर पेपर 1 च्या गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार केली जाते. 

 1. चुकीच्या उत्तराकरिता १/४ इतके गुण कमी करण्यात येतात 
 2. एका पेक्षा अधिक उत्तरे दिल्यास तो प्रश्न चुकीचा ठरवण्यात येतो व त्याचे १/४ गुण कमी केले जातात
 3. जर प्रश्नाचे अनुत्तरित असेल तर गुण वजा करण्याची पद्धत लागू होत नाही

एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा MPSC Rajyaseva Mains Syllabus

MPSC Pre परीक्षेच्या आधारावर जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीनुसार परीक्षार्थी एमपीएससी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात. 

एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम MPSC Rajyaseva Mains Exam Syllabus तुम्ही पुढील लिंक वर डाउनलोड करू शकतात – Download 

एमपीएससी PSI/STI/ASO अभ्यासक्रम MPSC PSI/STI/ASO Syllabus (Combine Exam)

ह्या परीक्षेस महाराष्ट्र दुय्यम सेवा गट- ब स्पर्धा परीक्षा असेही नाव आहे. आणि हि परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाते, सयुंक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. 

एमपीएससी सयुंक्त पूर्व परीक्षेचे स्वरूप (MPSC Combined Exam)

विषय व संकेतांकसामान्य क्षमता चाचणी 
प्रश्नसंख्या१००
एकूण गुण १००
दर्जा पदवी 
माध्यम मराठी व इंग्लिश 
परीक्षेचा कालावधी १ तास 
परीक्षेचे स्वरुप ऑब्जेक्टिव्ह 

MPSC PSI/STI/ASO Pre Syllabus

 • चालू घडामोडी- राष्ट्रीय व जागतिक 
 • नागरिकशास्त्र- भारताच्या राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन, ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)
 • इतिहास- आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास 
 • भूगोल- (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांक्ष, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहर, नद्या, उद्योगदधंदे इ.   
 • अर्थव्यवस्था- भारतीय अर्थव्यवस्था– राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इ. शासकीय अर्थव्यवस्था– अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इ. 
 • सामान्य विज्ञान- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र
 • बुद्धिमापन चाचणी व अंकगणित

नोट-

 1. चुकीच्या उत्तराकरिता १/४ इतके गुण कमी करण्यात येतात 
 2. एका पेक्षा अधिक उत्तरे दिल्यास तो प्रश्न चुकीचा ठरवण्यात येतो व त्याचे १/४ गुण कमी केले जातात
 3. जर प्रश्नाचे अनुत्तरित असेल तर गुण वजा करण्याची पद्धत लागू होत नाही

एमपीएससी सयुंक्त मुख्य परीक्षा अभ्यासक्रम MPSC PSI/STI/ASO Mains Exam Syllabus

मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम तुम्ही पुढील लिंक वर डाउनलोड करू शकतात – Download 

MPSC साठी लागणारे शिक्षण / पात्रता?

MPSC साठी लागणारे शिक्षण / पात्रता?

 1. भारतीय नागरिकत्व
 2. एमपीएससी वयोमर्यादा
  • मागासवर्गीय- किमान १९ ते कमाल ३८
  • मागासवर्गीय/आ. दु. घ./ प्रावीण्यप्राप्त खेळाडू/माजी सैनिक/आणीबाणी व अल्पसेवा राजादिष्ट अधिकारी – किमान १९ कमाल ४३
  • दिव्यांग- वयाच्या ४५ वर्षापर्यंत
 1. एमपीएससी शैक्षणिक पात्रता
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली विहित अर्हता. 
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
  • पदवीच्या शेवटच्या वर्षास असलेले उमेदवार पूर्व परीक्षेस पात्र असतील परंतु मुख्य परीक्षेचा अर्ज साधार करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे

MPSC मार्फत घेतल्या विविध जाणाऱ्या परीक्षा? (MPSC Exams)

एमपीएससी आयोगामार्फत पुढील परीक्षा घेण्यात येतात

 • MPSC राज्यसेवा परीक्षा
 • MPSC संयुक्त परीक्षा गट- बी आणि गट- सी
 • महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा
 • महाराष्ट्र वनसेवा परीक्षा 
 • महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा
 • महाराष्ट्र न्यायिक सेवा परीक्षा 

MPSC  पदांची माहिती? (MPSC Post List in Marathi)

एमपीएससी मार्फत प्रथम व द्वितीय श्रेणी अधिकाऱ्यांची निवड केली जाते यालाच गट- अ आणि गट- ब अधिकारी असेही म्हटले जाते या दोन्ही गटातील पदे पुढील प्रमाणे-

गट- अ 

 • उपजिल्हाधिकारी (Deputy Collector)
 • सहाय्यक विक्रीकर आयुक्त- (Assistant Commissioner of Sales Tax)
 • उपनिबंधक सहकारी संस्था (Sub-registrar Cooperative Societies) 
 • उपमुख्य कार्यकारी अधिकारी (Deputy Chief Executive Officer)
 • मुख्याधिकारी- नगरपालिका (Chief Officer- Nagarpalika)
 • सहाय्यक पोलीस आयुक्त (Assistant Commissioner of Police (ACP))
 • ब्लॉक विकास अधिकारी (Block Development Officer (BDO))
 • तहसीलदार (Tahsildar)
 • पोलीस उपअधीक्षक (Deputy Superintendent of Police (DySP))
 • सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (Assistant Regional Transport Officer (ARTO))

गट- ब

 • नायब तहसीलदार (Naib Tahsildar)
 • तालुका निरीक्षक भूमी अभिलेख (Taluka Inspector of Land Records)

MPSC Exam Notification 2022

अर्ज करण्याची अंतिम तारीख (MPSC Exam Last Date )1 June 2022
MPSC Rajyaseva 2022 Exam Date21 August 2022
MPSC hall ticket 2022 DateTo be notified
MPSC Result 2022To be notified

Share This Article