महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 साठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांची स्कॅन उत्तरपत्रिका, गुण व गुणांची सीमारेषा आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता कर सहायक आणि लिपीक टंकलेखक परीक्षेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.
आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या लिपिक टंकलेखक व कर सहायक या पदांच्या भरतीकरिता मुख्य परीक्षेनंतर संगणक प्रणालीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर चाचणी पात्रता (Qualifying) स्वरूपाची असेल. सविस्तर कार्यपद्धत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असं आयोगाकडून कळवण्यात आलं आहे.
आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या लिपिक टंकलेखक व कर सहायक या पदांच्या भरतीकरिता मुख्य परीक्षेनंतर संगणक प्रणालीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर चाचणी पात्रता (Qualifying) स्वरूपाची असेल. सविस्तर कार्यपद्धत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) October 23, 2021
कर सहायक आणि लिपिक टंकलेखक परीक्षेतील टायपिंग म्हणजेच टंकलेखनाची परीक्षा संगणक आधारित प्रणालीत घेण्याच्या आयोगाच्या निर्णयाचं उमदेवारांकडून स्वागत करण्यात आलं आहे. आयोगाच्या या निर्णयामुळं परीक्षेत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आळा बसेल, अशा प्रतिक्रिया उमेदवारांकडू व्यक्त करण्यात आल्या आहेत.