⁠  ⁠

MPSC : PSI परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 2019 मध्ये झालेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामधील पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरिक्षक (Police Sub Inspector) पदाच्या 496 पदापैकी 494 पदांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. अनाथ संवर्गाच्या दोन पदांचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. पोलीस उपनिरीक्षक पदाचा अंतिम निकाल जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जाहीर केलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या अंतिम निकालात पुण्याच्या निलेश विलास बर्वे यानं राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर, अहमदगनरचा विजय सैद यानं मागासवर्गीय प्रवर्गातून पहिला क्रमांक पटकवला आहे. मुलींमध्ये कोल्हापूरची सुप्रिया रावण ही पहिली आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं विद्यार्थ्यांच्या माहितासाठी वेबसाईटवर निकाल जाहीर केला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं निवड झालेल्या 494 उमदेवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यानंतर यशस्वी उमेदवारांची कागदपत्रं तपासण्यात येणार आहेत. यामध्ये एखाद्या उमेदवारांच्या कागदपत्रात विसंगती आढळल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल, असं आयोगाकडून कळवण्यात आलं आहे.

TAGGED: ,
Share This Article