महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा – २०२० कोविड-१९ मुळे स्थगित करण्यात आली होती. ही परीक्षा शनिवार ४ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी नवे प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उमेदवारांनी हे प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे, जुन्या प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
याकडे लक्ष द्या
– नवे प्रवेशपत्र डाऊनलोड करून, त्याची प्रिंट काढलेले मूळ स्वरुपातील प्रवेशपत्र सोबत आणावे.
– नव्या प्रवेशपत्राशिवाय परीक्षेसाठी प्रवेश मिळणार नाही.
– आधारकार्ड, लायसन्स, मतदान कार्ड, पासपोर्ट, पॅनकार्ड यापैकी एक ओळपत्रप म्हणून सोबत आणावे, त्यासोबत त्याची छायांकित प्रत सोबत आणणेही अनिवार्य आहे. केवळ छायांकित पत्र सोबत आणल्यास परीक्षा देता येणार नाही.
– परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
– कोव्हिड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे.
– परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.
– आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना परीक्षेच्या वेळी शारीरिक / परस्पर अंतराच्या (Social Distancing) अनुषंगाने करावयाची कार्यवाही / उपाययोजनासंदर्भातील सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे.
– सदर सूचनांचे उल्लंघन करणा-या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.
– प्रवेश प्रमाणपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या [email protected] व
[email protected] या ईमेल व अथवा १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करून घेता येईल.