MPSC ची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; नवीन तारीख जाणून घ्या..

Published On: सप्टेंबर 26, 2025
Follow Us

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यात पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 28 सप्टेंबरला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. ही परीक्षा आता 9 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे.

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. ज्यामुळे विविध गांवाचा, तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे.राज्यातील हवामान खात्याने पुढील काही दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

अशा परिस्थितीत कोणताही उमेदवार परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी शासनाने पत्र क्रमांक मलोआ-1125/प्र.क्र.236/मलोआ, दिनांक 26 सप्टेंबर, 2025 अन्वये केलेल्या विनंतीनुसार प्रस्तुत परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे.

सदर निर्णयानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 , दिनांक 28 सप्टेंबर,2025 ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक 9 नोव्हेंबर, 2025 रोजी घेण्यात येईल. उपरोक्त परीक्षेच्या दिनांकातील बदलामुळे दिनांक 9 नोव्हेंबर, 2025 रोजी घेण्यात येणारी पूर्वनियोजित महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 चा सुधारित दिनांक शुद्धिपत्रकाद्वारे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now