⁠
Inspirational

आधी ग्रामपंचायत सदस्य आणि आता जिद्दीने रेवती झाली पीएसआय !

आपल्या कामाचा ठसा आपणच प्रयत्नांनी मिळवायचा असतो. हेच रेवती भोसले हिने दाखवून दिले.नीरेचे माजी उपसरपंच बाळासाहेब भोसले व वंदना भोसले या शेतकरी दांपत्याची रेवती ही मुलगी आहे.तिचे प्राथमिक शिक्षण नीरा-शिवतक्रार जिल्हा परिषद शाळेत, तर लि. रि. शहा कन्याशाळेत माध्यमिक शिक्षण झाले.

मराठी माध्यमातून शिकल्याने ती कणखर बनली. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात ‘बीसीएस’ पदवी घेतली. त्यानंतर नोकरी करायचीच नाही, हा निर्धार करत स्वतःची एनजीओ संस्था स्थापन करून महिला सबलीकरणाचे काम सुरू केले.

ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडूनही आली. या तिच्या कामातून तिला समाजासाठी अधिक काम करून शकते आणि ‘मी अधिकारी होऊ शकते,’ हा आत्मविश्वास मिळाला. तिच्या इंदिरा गांधी या आदर्श आहेत. २०१९च्या पीएसआय परीक्षेत अवघ्या दोन गुणांनी यश दुरावले. मग स्मार्टफोनसह अनेक गोष्टींचा त्याग करून सन २०२२ च्या परीक्षेत यश खेचून आणत अखेर ती पीएसआय झाली. नीरा (ता. पुरंदर) येथील रेवती भोसले या युवतीच्या यशाची ही कहाणी आहे.तिने २०१९ला पीएसआयची पहिल्यांदा परीक्षा दिली, मात्र दोन गुणांनी अपयश आले.

करिअर मार्गदर्शक उमेश कुदळे यांच्या प्रेरणेने सन २०२२ ला प्री आणि मेन्स परीक्षांमध्ये उत्तम कामगिरी बजावली. मैदानी चाचणी ही कमजोरी ठरू नये म्हणून थेट कोल्हापूर गाठून सरदार भित्तम, संदीप नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी केली. सरावावेळी पाय जखमी झाल्यावर बेडरेस्टचा डॉक्टरी सल्ला असतानाही मैदानावर जाऊन बसायची. चाचणीआधी पाय बरा झाला आणि मैदानातही उच्चांकी गुण मिळाले.सोबतीने कर सहाय्यक, मंत्रालय सहायक परीक्षांमध्ये स्वतःला‌ आजमावले, पण अपयश आले. पण दुसऱ्याच प्रयत्नात २९७.५० गुण मिळवून रेवती हिने अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात सर्वोच्च स्थान प्राप्त केले आहे.

Related Articles

Back to top button