गायत्रीची पोलिस उपनिरिक्षक पदाला गवसणी ; मेहनतीला आले यश !
MPSC PSI Success Story : आपण मेहनत घेतली तर त्याला यश हे मिळतेच.तिने दिवसभराच्या अभ्यासाबरोबरच आपल्या अभ्यासासोबत मैदानी तयारीकडे लक्ष दिले. दरदरोज पहाटे उठून पळण्यासाठी जाणे, व्यायाम करणे तिने सुरु केले. सरदवाडी रोड भागातील इंजिनिअर झालेल्या गायत्री दिगंबर बैरागी हिने अथक परिश्रम करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या पोलिस उपनिरिक्षक पदाला गवसणी घातली. गायत्रीचे वडील एस. टी. महामंडळात नोकरीला असल्याने लहानपणासूनच तिला वडीलांच्या खाकी पोषाखाचे आकर्षित होतेच.
गायत्रीचे दहावीपर्यंतचे शिक्षक येथील वाजे विद्यालयात झाले असून बारावीपर्यंतचे शिक्षक तिने सिन्नर महाविद्यालयातून पूर्ण केले. बारावी विज्ञान शाखेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर नाशिक येथील के. के. वाघ इंजिनिअरींग महाविद्यालयात इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग शाखेत प्रवेश घेतला.तसेच आई-वडीलांसह सिव्हिल इंजिनिअरिंग झालेल्या भावानेही तिला स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासासाठी पाठिंबा दिला.
इंजिनिअरिंगमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने तीला बख्खळ पगाराच्या नोकरीच्या संधीही आल्या होत्या. मात्र, शासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न तिला खुणावत होते.त्यासाठी तिने मेहनत देखील घेतली आणि हे स्वप्न पूर्ण झाले.
मागील वर्षी झालेल्या पोलिस उपनिरिक्षक पदाच्या जागेसाठी तीने अर्ज करत पुर्व परिक्षा दिली. त्यात उत्तीर्ण झाल्याने तीचा मनोबल अधिकच वाढले. त्यानंतर मुख्य परिक्षेच्या तयारीसोबतच तिने मैदानी सराव देखील केला. त्यामुळेच तिला पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली.