MPSC PSI Success Story जेव्हा सामान्य घरातील मुली पोलिस होऊ पाहते आणि त्यासाठी अहोरात्र मेहनत करते. ही बाब अनेक तरूणांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. अशीच इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावच्या हद्दीतील चव्हाणवाडीची लेक गायत्री पांडुरंग चव्हाण-राळेभात. तिने पोलिस उपनिरीक्षकपदाला गवसणी घातली आहे.
गायत्रीचे वडील भिगवणमधील बिल्ट कंपनीमध्ये नोकरी आहेत. तर आई उज्वला चव्हाण ह्या गृहिणी आहेत. तिच्या या स्पर्धा परीक्षेच्या यशात तिच्या पतीचा देखील मोलाचा वाटा आहे. त्यांनी तिला वेळोवेळी प्रोत्साहन तर दिलेच पण झेप घेण्यासाठी बळ देखील दिले.गायत्रीने विद्या प्रतिष्ठानच्या मराठी शाळेमधून प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
अकरावी टी.सी कॉलेज व बारावी भिगवण जवळील दत्तकला शिक्षण संस्थेमधून झाली. पदवी व पदव्युत्तर शिक्षण पुण्यातील कृषी महाविद्यालयांमधून झाले. याच दरम्यान तिने ठरवले की आपल्याला अधिकारी व्हायचे आहे. त्यासाठी तिने सातत्याने अभ्यास देखील केला. इतर गोष्टींपासून दूर राहून स्वत:वर नियंत्रण ठेवले. तसेच, प्रामाणिकपणे अभ्यास केला. तिने या काळात गरजेपुरताच सोशल मीडिया वापर केला.
तसेच या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा नियोजनबद्ध अभ्यास केला. यशस्वी होण्यासाठी संयम, प्रामाणिकपणा फार महत्त्वाचा असतो. तसेच कोरोनाच्या काळामध्ये ही अभ्यासामध्ये सातत्य ठेवल्यामुळे यश मिळाले. यामुळेच तिला या परीक्षेत यश मिळाले.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची फेब्रुवारी २०२० ची जाहिरातीची परिक्षा प्रक्रिया कोरोनामुळे काही काळ थांबली होती. २४ मार्च २०२३ अंतिम परीक्षेची मुलाखत झाली होती. तिची यामध्ये पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे.