MPSC PSI Success Story : घरातील लेक प्रगतीचे पाऊल टाकत असेल तर सारं घर शिक्षित होतं. तसंच वडिलांच्या पाठोपाठ प्रियांकाने देखील पोलीस खात्यात नोकरी मिळवली. ही आई – वडिलांसाठी अभिमानाची बाब होती. प्रियंकाचे वडील रामसिंग बैस हे देखील गोंदिया पोलिस दलात कार्यरत आहेत.पोलीस खात्यात नोकरी करत असलेल्या पोलिस शिपायाची मुलीने एमपीएससी परीक्षा पास करत पीएसआय होण्याचा मान मिळविला आहे.
गोंदिया शहराच्या फुलचूर भागात राहणाऱ्या प्रियंका बैस. तिचे सारे शिक्षण याच भागात झाले.लहानपणापासूनच वर्दीची नोकरी मिळावी हे स्वप्न तिने पहिले असून त्याची तयारी देखील प्रियंकाने वयाच्या २१ व्या वर्षी सुरु केली.
शालेय जीवनात असताना तिने आंतराष्ट्रीय रग्बी खेळाडू म्हणून तिने जिल्ह्याचे नाव लौकिक केले आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना तिला वडिलांचे मार्गदर्शन तर मिळालेच…एका वाचनालयात बसून तिने अभ्यास करत हे यश संपादन केले आहे. तसेच तिला खेळाची पण प्रचंड आवड असल्याने एमपीएससी परीक्षेत यश संपादन करत स्पोर्ट कोट्यातून विदर्भात पहिला तर राज्यात तिसरा क्रमांक पटकाविला आहे. इतकेच नाहीतर प्रियंका बैस या तरुणीने २३व्या वर्षी PSI होण्याचं स्वप्न पूर्ण केलंय मित्रांनो, स्वप्नांचा पाठलाग करत राहिले तर एक ना एक दिवस यश हे मिळतेच.