गावातील मुलगा फौजदार होतो तेव्हा साऱ्या गावासाठी ठरतो अभिमान !
कोणत्याही परिस्थितीसोबत मात करत शिक्षण पूर्ण करून स्वप्न लाढण्याची ताकद ही परिस्थितीच देत असते. तसेच, आर्थिक व इतर साऱ्या परिस्थितीवर मात करत मौजे केसराळी, ता. बिलोली येथील भूमिपुत्र चि. सचिन दाऊजी रघुपती, केसराळीकर याची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली आहे.
सचिनचे पहिली ते सहावी जि.प.कन्या शाळा,कुंडलवाडी, सातवी जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा, केसराळी, आठवी ते दहावी श्री. छञपती शिवाजी हायस्कूल, सगरोळी, पॉलिटेक्निक अर्थात अभियांत्रिकी अभ्यासक्रम पदवी शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज, नांदेड तर पुढील बी.ई. मेकॅनिकल अर्थात अभियांत्रिकी अभियंता पदवी रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय,नागपूर येथून शिक्षण पूर्ण केले आहे.
त्याला लहानपणापासून वर्दीचे आकर्षण होते. आपण पोलिस व्हावे हे त्याला नेहमी वाटायचे. त्यासाठी अभ्यासाच्या सोबतच तो शारीरिक मैदानी चाचणी देखील करायचा. याच मेहनतीच्या जोरावर त्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा – २०२० पोलीस उपनिरीक्षक हे पद मिळाले आहे.अथक आणि नियमित अभ्यासाने सचिनने हे यश संपादन केले आहे.