महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत जानेवारी, २०२२ मध्ये नियोजित तीन परीक्षांच्या सुधारित दिनांकाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत रविवारी २ जानेवारी २०२२ रोजी आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय काही दिवसापूर्वीच घेतला होता. दरम्यान, आता या परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आले आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा आता २३ जानेवारी रोजी होणार आहेत. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२० (संयुक्त पेपर क्रमांक १) ची परीक्षा २२ जानेवारी २०२२ ऐवजी २९ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.
सोबतच महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२० (संयुक्त पेपर क्रमांक २, पोलीस उपनिरीक्षक) २९ जानेवारी २०२२ ऐवजी ३० जानेवारी २०२२ ला होणार आहे.
कोरोना महामारीत शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ न शकली नव्हती. त्यामुळे अनेक उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडून गेली. या उमेदवारांची शासकीय सेवेची दारंदेखील बंद झाली होती. पण राज्य सरकारने यावर सहानुभूतीपूर्वक विचार करत कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळ विशेष बाब म्हणून स्पर्धा परीक्षांना बसण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेतला होता. त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी एक आदेशही जारी करण्यात आला होता. त्यानंतर अखेर राज्य लोकसेवा आयोगानं एक पत्रक जारी करत अर्ज केव्हा भरता येतील याबाबत माहिती दिली आहे.
1 मार्च 2020 ते 17 डिसेंबर 2021 या कालावतील वयोवर्यादा ओलांडलेल्यांना 27 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करता येऊ शकेल. या अर्जांसाठीचं ऑनलाईन शुल्कहे देखील 31 डिसेंबरपर्यंत भरावं लागणार आहे. तर एसबीआयमध्ये चलनाद्वारे शुल्क भरायचं झाल्यास चलनाची प्रत 1 जानेवारीपर्यंत घ्यावी लागेल. त्यानंतर आज 3 जानेवारीपर्यंत बँकेच्या वेळेत चलनाद्वारे शुल्क करण्यास मुदत देण्यात आली आहे.