MPSC Succes Story प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी येत असतात.तशाच अंकूशच्या देखील आयुष्यात अडखळ्यांचा पाढा सतत चालू होता. तो वाढत्या वयात असताना त्याचे वडील वारले. त्यामुळे, कुटुंबाचा प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळताना…वडिलोपार्जित शेती करत अकूंशने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू ठेवला होता. तो निफाड तालुक्यातील वणी या गावचा मुलगा.अंकुश इयत्ता नववीत असताना वडिलांचे निधन झाले. याच वर्षी आजी, काकांचेही निधन झाले. त्यामुळे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर होती.
साऱ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ह्या शेतीवर होत नव्हता. त्याने गावाजवळच्या शाळेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर आयुष्यात आपण काहीतरी वेगळे करून दाखवायचे, या ध्येयाने पेटलेल्या अंकुशने स्पर्धा परीक्षाच्या तयारीला २०१४ पासून सुरुवात केली. आता अभ्यास कसा करायचा? यासाठी कोणाचा पाठिंबा मिळेल? म्हणून त्याने नाशिकमध्ये भाभानगर येथील गिते अभ्यासिका लावली. तिकडे तो तासनतास अभ्यास करायचा आणि आवश्यकतेनुसार गावाकडील शेतीची संपूर्ण कामे करायची, अशी दिनचर्या अंकूशची होती. मध्यंतरी त्याचे देखील लग्न झाले. या अभ्यासाच्या काळात त्याच्या पत्नीचा देखील त्याला ठाम पाठिंबा होता.
प्रचंड संयम, अहोरात्र मेहनत आणि अभ्यास यामुळेच महाराष्ट्र सेवा गट-क २०२१ परीक्षेत मंत्रालय क्लर्क आणि कर सहाय्यक परीक्षेत यश मिळाले. त्याला एक नाहीतर दोन पदे मिळाली. या दरम्यान त्याने अनेक सरकारी परीक्षा दिल्या. त्यात अपयश आले पण मेहनत करत राहिला. कुटुंबाच्या खंबीर पाठिंब्यामुळे त्याचे स्वप्न सत्यात उतरले.