MPSC Success Story माहेरच्या बरोबरच सासरचा पाठिंबा मिळाला तर मुलगी काय करू शकते हे करवीर तालुक्यातील हळदी गावातील ऐश्वर्या नाईक – डुबल यांनी दाखवून दिले आहे. तिची मुख्याधिकारी पदी निवड आहे. तिची विविध पदांवर तीनदा निवड झाली.
ऐश्वर्या नाईक-डुबल ही मूळची करवीर तालुक्यातील हळदी गावातील रहिवासी आहे. मात्र सध्या नोकरी निमित्त सांगली येथे वास्तव्यास आहे. ऐश्वर्याचे वडील क्रीडा संचालक आहेत तर आई गृहिणी आहे. लहानपणापासूनच शालेय जीवनात ती हुशार होती शिवाय उत्कृष्ट खेळाडू देखील होती.ऐश्वर्याने आपले प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत पुर्ण केल आणि पुढे कोल्हापूरातील पद्माराजे हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेऊन न्यू कॉलेजमधून पदवी मिळविली.
ऐश्वर्याच्या वडिलांची आपली मुलगी प्राध्यापिका व्हावी, अशी इच्छा होती. मात्र ऐश्वर्याने आपल्याला प्रशासकीय सेवेमध्ये जायचे आहे हे निश्चित केलं होतं. यामुळे पदवी घेत असतानाच तिने स्पर्धा परीक्षेसाठी तयारी सुरू केली होती. कोरोनाच्या काळानंतर ती अर्थशास्त्र विषयातून सेट परिक्षा देत पास झाली. तर एमपीएससी परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात ऐश्वर्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपनिरीक्षकपदी निवड झाली. तर दुसऱ्या प्रयत्नात उप-अधिक्षक भूमिअभिलेख अधिकारीपदी निवड झाली. तर तिसऱ्या प्रयत्नात मुख्याधिकारी पदी निवड झाली आहे. तिचे पती देखील प्रशासकीय अधिकारी आहेत.