⁠  ⁠

ऊसतोड मजुराचा मुलगा बनला क्लासवन अधिकारी; वाचा दत्ता चव्हाण यांचा प्रेरणादायी प्रवास..

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC Success Story : आपल्या आयुष्यात ध्येय निश्चित असले तर यशाची दारे जिद्द आणि चिकाटीने खुली होतात. बीडमधील गेवराई येथील दत्ता चव्हाण.एक ऊसतोड मजूराचा मुलगा.‌ २० ते २५ वर्षे ऊसतोड कामगार म्हणून कोयता हातात घेत, पोटाला चिमटा घेऊन मुलांना शिक्षण दिले. एवढंच नाही तर मुलांच्या शिक्षणासाठी जवळपास पाच एक्कर शेती विकली.

त्याचे प्राथमिक शिक्षण तांड्यावरील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक आश्रम शाळा वारोळा (ता माजलगाव) तर उच्च माध्यमिक शिक्षण गेवराईतील गढी येथील जयभवानी उच्च माध्यमिक विद्यालयात पूर्ण केले.छत्रपती संभाजीनगर येथे अभियंताचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी युपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्लीला गेले. तिकडे त्यांनी युपीएससीचा अभ्यास केला.मात्र, दोन वेळा परिक्षा देऊन यात अपयश आल्याने त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा (एमपीएससी) परिक्षेची तयारी सुरु केली.

दत्ता चव्हाण याने व्हिजेएनटी मधून राज्यात दुसरा क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने असिस्टंट कमिशनर कौशल्य विकास किंवा उद्योजकता अधिकारी या पदावर एक (क्लासवन) अधिकारी म्हणून निवड झाली आहे.आई-वडिल यांच्या कष्टाचे चीज करुन दत्ता चव्हाण याने एमपीएससी परिक्षेत घवघवीत यश संपादन केले.

Share This Article