MPSC Success Story : लहानपणापासून दिपकच्या घरची परिस्थिती बेताची होती. त्याची जिद्द मात्र निराळी होती. दिपक हा मूळचा दीपक हे बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पळसखेड येथील गरीब कुटुंबातील लेक शिक्षण पूर्ण करत असतानाच दीपक याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ध्येय पूर्तीचा वसा घेतला.
त्याचे प्राथमिक शिक्षण हे गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. तर तसेच आठवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण दी न्यू इरा हायस्कूल जळगाव जामोदमध्ये झाले. आता इथं पर्यंत थांबून चालणार नाही म्हणून त्याने कृषी विषयात पदवी घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने बी.एस्सी (कृषी) क्षेत्राची निवड केली. त्याने हे शिक्षण श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती येथे पूर्ण केले. याच दरम्यान त्याने स्पर्धा परीक्षेची देखील तयारी चालू केली. आपल्या परिस्थितीचे भांडवल न करता….कोणत्याही अपयशाला दोष न देता. त्याने अभ्यास चालू ठेवला.
समाज माध्यमांपासून दूर राहून झोकून देऊन अभ्यास केला.त्यामुळेच, दिपक याचे कॅनरा बँकेत Afo म्हणून सिलेक्शन झाले. पण अजून चांगले पद हवे. यासाठी तो प्रयत्न करत राहिला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले…स्पर्धा परीक्षेतून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात एमपीएससीमधून कृषी उपसंचालक पदी निवड झाली. त्यामुळे त्याच्या आई – वडिलांचा देखील अभिमानाने ऊर भरून आला.