⁠  ⁠

दिग्विजयची गगनभरारी! पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परीक्षा मिळविले यश..

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

दिग्विजय विश्वास मोरे या तरूणाचा प्रवास हा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. दिग्विजयने जुनी सांगवीत शितोळेनगरमध्ये राहात आहेत. मुळचे वरंवड (ता. दौंड) येथील असलेले मोरे कुटूंब…दिग्विजय यांचे वडील डॉ. विश्वास मोरे यांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले आहे. आई ज्योती मोरे डॉक्टर आहेत. लहान भाऊ स्थापत्य अभियांत्रिकीमध्येच पदविकेचे शिक्षण घेत आहे.

दिग्विजयने पुण्यातून स्थापत्य अभियांत्रिकी विषयात पदवी मिळवल्यानंतर त्यांनी सर्व लक्ष स्पर्धा परीक्षकडे केंद्रीय केले. नगररचना विभागातच करिअर करायचे मनोमन ठरवले. त्यादिशेने अभ्यास सुरू केला.त्यांनी स्व – अध्ययनावर भर दिला. स्वतःची इच्छा असेल तर, आपोआपच यश मिळते. हेच त्यांच्या बाबतीत झाले. त्यांना पहिल्याच प्रयत्नात यशही मिळाले. सहायक नगररचनाकार पदावर त्यांची निवड झाली आहे.

हा प्रवास सोपा नव्हता. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आईने आधार दिला. मावस काका डॉ. अशोक दिवेकर यांनी मार्गदर्शन केले. त्याला स्वअध्ययनाची जोड देत राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेचे आव्हान त्याने पेलले आणि ते यशस्वी झाले.

Share This Article