आदित्य वडवणीकर याची घरची परिस्थिती तशी बेताचीच…वडील रिक्षा चालक तर आई आदिवासी आश्रम शाळेत कामाला…यावर पूर्ण कुटूंब अवलंबून होते.त्यांच्या कुटुंबाचा परंपरागत हातमागाचा व्यवसाय असल्याने कुटुंब १९६५च्या दरम्यान अहमदनगर येथे स्थायिक झाले.
आदित्यचे वडील दत्ता वडवणीकर पदवीधर झाले. नोकरी लागेल, या आशेने सर्वत्र फिरले. परंतू, नोकरी लागली नाही. पुढे शालन यांच्याबरोबर लग्न झाले.आदिवासी विभागांमध्ये आश्रम शाळेत नोकरी मिळाली. त्यामुळे कुटुंबाला थोडे स्थैर्य प्राप्त झाले. दत्ता यांनी काही ठिकाणी खासगी नोकरी केली. या नोकरीत होणारी पिळवणूक पाहून जुनी रिक्षा व विकत घेतली.रिक्षाचा व्यवसाय सुरू केला, तोपर्यंत मुलेही मोठी झाली. मुलांच्या चांगले शिक्षण देण्यावर भर दिला. आदित्यने अकरावी- बारावीला त्यांनी रेसिडेन्सिअल हायस्कूलला प्रवेश घेतला.
त्याने न्यू आर्ट्स महाविद्यालयातून पदवीचे शिक्षणही घेतले.शालेय अभ्यास करताना त्याने तबला विशारद ही पदवी मिळवली. त्याने रयत शिक्षण संस्थेचे श्रीरामपूर येथील बोरावके महाविद्यालय पदव्युत्तर शिक्षण घेतले. तेथून ऑरगॅनिक केमिस्ट्री विषयात एमएस्सीची पदवी प्रथम श्रेणीत मिळविली.एमएस्सी झाल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी पुणे गाठले. जानेवारी २०२३ रोजी पुणे महापालिकेती लिपिक-टंकलेखक पदाची परीक्षा पास होऊन शासकीय सेवेत पर्दापण केले. शिक्षण हाच एकमेव परिस्थिती बदलण्याचा पर्याय आहे. या तत्वानुसार मुलांच्या शिक्षणावर विशेष लक्ष दिले.आदित्य हा राज्यकर निरीक्षक झाला, ही बाब कुटुंबासाठी खूप आनंदाची आहे.