आपण जर एखादी गोष्ट करण्याचा निर्धार केला तर त्यासाठी कष्टाची तयारी देखील हवी. हेच धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील घारगाव येथील डॉ. महेश अरविंद घाटुळे यांनी करून दाखवले आहे.
त्यांनी सर्वप्रथम शिक्षणाचा पाया मजबूत केला व त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. त्याचे प्राथमिक शिक्षण हे गावातच झाले. महेशनी त्यानंतर माध्यमिक अंबेजोगाईच्या गुरुदेव विद्यालयात तर उच्च माध्यमिक तेथीलच योगेश्वरी महाविद्यालयात पुर्ण केले. पुढे नांदेडच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.
लहानपणापासूनच अभ्यासात हुशार. चांगले शिक्षण घ्यायचं, सातत्यपूर्ण अभ्यास करायचा अन् चांगल्या हुद्यावर जायचं, असा त्यांचा ध्यास होता.एम.डी करत असताना त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली.अवघ्या २९ वर्षीय महेश घाटुळे यांनी २०२३ पहिल्या प्रयत्नात मध्ये पूर्व, मुख्य व तद्नंतर यंदा मुख्य परिक्षेत सलग यश मिळवलं.
त्यांनी लॉकडाऊनचा देखील चांगला वापर करून घेतला.लॉकडाऊन पडल्यानंतरही महेश यांनी सातत्य कायम ठेवत अभ्यास केला. आयोगाची २०२३ मध्ये जाहीरात निघाल्यानंतर अर्ज करत केला आणि उपजिल्हाधिकारी पद मिळवत यशाला गवसणी घातली.