⁠  ⁠

बॅंड वादकाच्या मुलाची पोलिस उपनिरीक्षक पदी गगनभरारी!

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC Success Story : घरची परिस्थिती हलाखीची… ग्रामीण भागातील जडणघडण तरी बॅड वादकाच्या मुलाने सिद्ध करून दाखवले. प्रीतम पांडुरंग कुद्रे हा मूळचा शेवाळा येथील सुपुत्र. त्यांची स्वतःची शेती नसल्याने त्याची आई दुसऱ्याच्या शेतात शेतमजुरी करते तर वडील बॅंडबाजा वाजवतात. चार मुली आणि एक मुलगा असे सारे कुटुंब यावर अवलंबून….ह्या प्रीतमने ठेवली. त्याने शिक्षणाचा ध्यास घेतला आणि अधिकारी बनण्याचा निश्चिय केला.

प्रीतमचे शालेय शिक्षण हे गावातील विद्या विकास विद्यालय शेवाळा येथे झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण हे देगलूर महाविद्यालयीत झाले. पदवीचे शिक्षण हे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून केले.‌हे शिक्षण घेत असताना त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. अहोरात्र मेहनत घेतली. मैदानी सराव देखील केला. त्यामुळेच घरची परिस्थिती बेताची असतानाही मेहनत आणि प्रामाणिकपणा या जोरावर त्याने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. त्याची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मागासवर्गीय प्रवर्गातून राज्यात २६० व्या क्रमांकाने तो उत्तीर्ण झाला.त्याचा हा फौजदार होण्याचा प्रवास आणि घरच्यांच्या कष्टाची जाण अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

Share This Article