⁠
Inspirational

रायगडच्या सोनालीची MPSC च्या परीक्षेत यशाची झेप !

MPSC Success Story : जर आपले ध्येय निश्चित असेल तर कोणतीही पार्श्वभूमी नसताना देखील यशाची पायरी गाठता येते. हेच सोनाली तेटगुरे हिने करून दाखवले आहे. सोनालीचे वडील ग्रामसेवक आहेत. त्यामुळे तिने गावातील समस्या आणि इतर गोष्टी अधिक जवळून बघितल्या. सोनाली ही मूळची रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील ढालघर या गावची लेक.

एका सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेल्या सोनालीच्या या यशात आईवडिलांची चांगली साथ व भक्कम पाठबळ मिळाली.तिचे शालेय शिक्षण हे गावातच झाले. त्यानंतर तिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे २०१६ साली डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मिळवीत आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पूणे येथील ॲसेंजर या आयटी कंपनीत तीन वर्षे जॉब करून, तिला सतत वाटत होते की एम.पी.एस.सी. करावी या उद्देशाने तिने आपल्या जाॅबचा राजीनामा देऊन अभ्यास सुरू केला.

सोनालीने पहिल्याच प्रयत्नात आपली ध्येयपूर्ती करत स्वप्नंवत यश संपादन केले आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व तरुणाईने सोनालीचा आदर्श घ्यावा अशी तिची इच्छा आहे. चिकाटी, जिद्द व मेहनतीने अभ्यास करत आपले ध्येय निश्चित करुन अव्वल श्रेणीत उत्तीर्ण होत यश संपादीत करुन आपल्या आई वडिलांसह तालुक्याचे तसेच रायगड जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे.

Related Articles

Back to top button