MPSC Success Story : सुप्रिया सुभाष टाकळीकर हिच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. तिचे वडील सोलापूर महापालिकेत लिपिक, आई घरकाम करते त्यांनी लेकीला शिक्षणासाठी पाठिंबा दिला. सुप्रियाचे शालेय शिक्षण लष्कर परिसरातील मॉडर्न हायस्कूल येथे झाले.
तर बारावीपर्यंत संगमेश्वर महाविद्यालयात आणि त्यानंतर पदवीचे शिक्षण पुण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी येथे पूर्ण केले.आई कलावती यांनाही वाटायचे मुलगी सुप्रिया निश्चितपणे अधिकारी होईल. त्यामुळे तिने देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. सोलापूर महापालिकेत लिपिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे मेव्हणे विजयकुमार बादोले व हणमंतराव बादोले हे दोघेही पोलिस खात्यात अधिकारी आहेत. त्यांच्याप्रमाणे आपलीही मुलगी अधिकारी व्हावी हे स्वप्न सुभाष टाकळीकर यांनी पाहिले. त्यामुळेच तिला देखील प्रेरणा मिळाली.
या प्रवासात तिलापहिल्या व दुसऱ्या प्रयत्नानंतरही अपयश आल्यानंतर आई- वडील, मामा व भावाने तिला प्रोत्साहन दिले. मागील परीक्षांमधील चुका सुधारून सुप्रिया पुन्हा नव्या जोमाने अभ्यासाला लागली. अखेर, तिने आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.सुप्रिया सुभाष टाकळीकरने तिसऱ्या प्रयत्नात यश मिळविले आहे. तिसऱ्या प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य कर निरीक्षक (एसटीआय) परीक्षेत मुलींमधून राज्यात पहिला क्रमांक पटकाविला.