खरंतर ग्रामीण भागातील मुलींची लवकर लग्न होतात. तेव्हा कित्येकांचे स्वप्न अपुरे राहते. जिद्द व चिकाटी असेल तर अशक्य गोष्ट ही शक्य होते.स्वाती मारकड हिने लग्नानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. स्वाती अर्जुन यांच्या सासू शालन अर्जुन व सासरे हनुमंत अर्जुन यांनीही स्वाती यांना शिक्षण व अभ्यासासाठी मदत केली. पतीने तर शिक्षणासाठी पाठिंबा दिला आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करायला प्रोत्साहन दिले. स्वाती अर्जुन यांचे पती गुंडुराम अर्जुन आर्मीमध्ये कार्यरत असून देशसेवा करीत आहे.
लग्नानंतर पती यांनी पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन दिल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये यश मिळवता आले. यांना रुत्विक (वय ७ वर्षे) व रेहांश (वय ३.५ वर्षे) ही दोन मुले आहेत. घरच्यांनी दोन मुलांकडे लक्ष देवून त्यांच्या शिक्षणासाठी मदत केली.मूळात, स्वाती अर्जुन- मारकड यांचे माहेर माळशिरस तालुक्यातील कुरुबावी आहे. आई लक्ष्मी मारकड व वडिल धनंजय मारकड यांची घरची परस्थिती बेताची आहे. मोलमजुरी करुन कुंटुब चालवता. स्वाती यांचे प्राथमिक शिक्षण कुरुबावी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झाले.पाचवी- दहावी पर्यंत शिक्षण शिवपुरीमध्ये झाले.
अकरा व बारावीपर्यंत शिक्षण कळंब मधील वालचंद विद्यालयामध्ये झाले. बारावीनंतर त्यांचा २०१४ मध्ये कळंब गावातील गुंडुराम हनुमत अर्जुन यांच्याशी विवाह झाला. त्यानंतरही त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही. २०१७ मध्ये सांगोल्यामधील फार्मासी कॉलेज मधून ग्रॅज्युशन पूर्ण केले आणि स्पर्धा परीक्षेचा आभ्यास सुरु ठेवला.ऑक्टोबर २०२२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षा दिली. दरम्यानच्या काळामध्ये मुख्य परीक्षेसाठी वेळ असल्यामुळे जुन २०२३ सरळ सेवा परीक्षा दिली.
ऑक्टोबर २०२३ मध्ये एमपीएससीची मुख्य परीक्षा दिली. सरळ सेवा परीक्षेमध्ये यश मिळाले होते. सातरामधील शासकीय रुग्णालयामध्ये औषधनिर्माण अधिकारी म्हणून रुजू झाल्या. नोकरी करीत असताना ग्राउंडची तयारी सुरु ठेवली. त्यातही त्यांना यश आले. कळंब येथील स्वाती गुंडूराम अर्जुन- महिलेने लग्नाच्या दहा वर्षानंतर वयाच्या २८ व्या वर्षी मुलांचा सांभाळ करीत, संसाराचा गाडा हाकत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये यश मिळविलेले हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी प्रवास आहे.