⁠  ⁠

ग्रामीण भागातील शेतकरी कन्येची वनपरिक्षेत्र अधिकारी पदाला गवसणी !

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC Success Story : शेतकऱ्याची लेक ही वनपरिक्षेत्र अधिकारी होते, तेव्हा अनेकांसाठी ही प्रेरणादायी बाब ठरते. अशीच मोहोळ तालुक्यातील अंकोली गावातील विद्या सिताराम गायकवाड. तिचे आई-वडील शेती करतात. वडील शेती बघत छोटे मोठे बांधकामाचे काम घेतात. ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या अडचणीची तिला जाण असल्याने तिने जिद्दीने अभ्यास करायचे ठरवले.

विद्याचे इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत व महाविद्यालयात झाले. तर बारावीचे शिक्षण सोलापूर येथील जोशी महाविद्यालयात झाले.पदवी शिक्षण झाल्यानंतर तिने एमपीएससी परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. तिने कृषी क्षेत्रात पदवीचे शिक्षण घेतले. २०२२ रोजी राजपत्रित तांत्रिकसेवा संयुक्त पूर्व परीक्षा झाली. त्यानंतर महाराष्ट्र वनसेवेची परीक्षा ही दिली.

त्यानंतरचा टप्पा म्हणजे महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा एप्रिल २०२३ मध्ये दिली. त्याचा निकाल लागला आणि ती महाराष्ट्रातून अकराव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली.हा तिचा प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता. तिला यशाने तीन वेळा हुलकावणी दिली. तरी ही नाराज न होता मनात जिद्द बाळगून अखेर चौथ्या टप्प्यात यशाला गवसणी घातली आहे.

वन परिक्षेत्र अधिकारी (RFO) पदी निवड झाल्यावर संपूर्ण गावाला आणि घराला आनंद गगनात मावेनासा झाला.आता प्रशासनात चांगला अधिकारी म्हणून सर्वसामान्याला जास्तीत जास्त चांगली सेवा कशी देता येईल यासाठी तिचा प्रयत्न असणार आहे.

Share This Article