⁠
Inspirational

आई-वडील मोलमजूर कामगार ; मुलाची नायब तहसीलदार पदी गगनभरारी !

MPSC Success Story : घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची….आई – वडील मोलमजूर कामगार…. ग्रामीण भागातील वातावरण अशाही परिस्थितीत वीस गुंठे शेतीसोबतच इतरत्र मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालविणाऱ्या आई – वडिलांच्या कष्टाचे चीज झाले. महेश सुभाष हांडे यांची नायब तहसीलदार पदी निवड झाली आहे.

महेशचे संगननेर तालुका मुख्‍यालयापासून ४० किलोमीटर अंतरावर डोंगराच्‍या कुशीत वसलेले कोठे बुद्रुक गाव आहे.शेती हाच हांडे कुटुंबाचा मुख्‍य व्‍यवसाय. वीस गुंठे शेतीत कांद्यासह इतर पिके घेतात. स्‍वतःच्‍या शेतीतील काम झाले की मोलमजूरी करून मुलांना शिक्षणासाठी मदत करतात. राबणाऱ्‍या हातावर त्‍यांचा मोठा विश्‍वास आहे.महेश याने गरिबी काय असते हे अत्‍यंत जवळून अनुभवली होती.त्याचे पहिली ते सातवीपर्यंतचे महेश यांचे शिक्षण गावातीलच जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेत झाले. आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षणही गावातील अमृतेश्‍वर विद्यालयात झाले. दहावीत महेश यांनी दुसरा क्रमांक मिळविला. त्यानंतर त्याने इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण करण्याच्या निर्णय घेतला.अमृतवाहिनी तंत्रनिकेतन येथे मॅकेनिकल पदविकेसाठी प्रवेश घेतला.

ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील उच्च शिक्षणाची इच्छा असूनही आर्थिक परिस्थिती नसल्याने शिक्षण घेता आले नाही. मग कुटूंबाला हातभार लावण्यासाठी त्याने पिंपरीचिंचवड येथील टाटा मोटर्स मध्‍ये एक वर्ष नोकरी केली. सोबतच पुणे विद्यापिठात बी.ए.ला प्रवेश घेतला. दिवसभर नोकरी व रात्री अभ्‍यास असा दिनक्रम सुरू होता. त्यास २०१४ मध्‍ये राज्‍यशास्‍त्रात पदवी मिळाली. त्याने २०१५ ला राज्‍यसेवेची पूर्व परिक्षा दिली, मात्र पहिल्‍या प्रयत्‍नात अपयश झाला. मात्र अपयशानंतर चांगली तयारी करून परीक्षा देण्‍याचा निश्‍चय केला.महेश यांनी पिंपरी चिंचवड येथील नोकरी सोडून थेट कोपरगाव येथील आत्‍मा मालिक या संस्‍थेत प्रवेश घेतला व अभ्‍यासाला सुरुवात केली. २०१६ मध्‍ये महाराष्‍ट्र राज्‍य लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली यामध्‍ये महेश यांना ९०० पैकी ४८२ गुण मिळाले आणि नायब तहसीलदार पदावर त्‍यांची निवड झाली. मोलमजुरी करून अत्‍यंत हलाखीच्‍या परिस्थितीत शिकवणाऱ्या आई – वडिलांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.

Related Articles

Back to top button