MPSC Success Story : आपली मेहनत आणि जिद्द हेच यशाचे खरे गमक असते. ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची परिस्थिती अत्यंत बिकट असूनही उच्च शिक्षण घेऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न अनेक विद्यार्थ्यांचे असते. पण त्यांना योग्य मार्गदर्शन व पाठिंबा मिळतोच असे नाही. शेतात मजुरी करणारी द्रोपदाबाई विश्वनाथ शंकरपाळे यांनी आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी रात्रंदिवस काबाडकष्ट केले.
घरची परिस्थिती हलकीच्या असताना शेतमजुरी करून नवनाथ संकपाळे याचे शिक्षण पूर्ण केले. नवनाथ हा फुलंब्री या गावचा लेक.नवनाथ संकपाळे याचा भाऊ सागर संकपाळे या चहा हॉटेल चालवितो. तर राणी हीचे लग्न झालेले आहे.नवनाथ संकपाळे याचे २०१३ मध्ये जिल्हा परिषद शाळेत दहावीचे शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर २०१५ मध्ये पाथरी येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात बारावीचे शिक्षण पूर्ण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून बी.एससी ची पदवी नवनाथ सकपाळे याने पूर्ण केली.
त्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.दोन वेळेस अपयश आल्यानंतरही नवनाथला धीर देत पुढे पुन्हा जोमाने अभ्यास करण्यासाठी पाठिंबा दिला. फुलंब्री नगरपंचायत परिसरात एक स्वतंत्र रूम भाड्याने घेऊन नवनाथ संकपाळे हा मागील गेल्या दोन वर्षापासून सातत्याने अभ्यास करीत होता.आईने धीर देत पुन्हा जोमाने अभ्यास करण्यासाठी पाठिंबा दिला. त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्याने अधिकारी व्हावं. त्याने देखील रात्रंदिवस अभ्यासाचे नियोजन करून अभ्यास केला.
या मेहनतीला अखेर यश मिळाले. अपयशाला न घाबरता जिद्ध आणि चिकाटी वापरून आईंच्या परिश्रमाचे चीज करीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगात पोलीस उपनिरीक्षक तिसऱ्या प्रयत्नात यश मिळविले.