---Advertisement---

बीडच्या लेकीने MPSC च्या परीक्षेत मिळवले दोनदा यश !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Success Story : बीड हा दुष्काळग्रस्त भाग पण तरी देखील बीडच्या प्रियंका मिसाळने जिद्द आणि चिकाटी याच्या जोरावर राज्यसेवा परीक्षेतून प्रियांकाची तहसीलदार पदासाठी निवड झाली आहे. प्रियंका ही मूळची बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील खोकरमोहा या गावची रहिवासी आहे.

तिची आई जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षिका आहे. तर वडील मुख्याध्यापक आहेत. तिने शालेय शिक्षण हे बीडमध्ये पूर्ण केले तर बारावी औरंगाबादमध्ये पूर्ण झाली. तसेच, तिने २०१५ साली तिने नागपूरच्या डेन्टल कॉलेजमधून बीडीएसची पदवी घेतली. उच्च शिक्षण घेऊ देखील तिला अधिकारी होण्याचंए स्वप्न खुणावत होते.

म्हणून, तिने एमपीएससी करायचा निर्णय घेतला. या दरम्यान तिने अभ्यासक्रम समजून घेणे, गेल्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे, कमीत कमी पुस्तक आणि जास्तीत जास्त सराव करणे याकडे विशेष लक्ष दिले. तरीही तिला सुरुवातीला काही कारणास्तव अपयश आले. पण ती अपयशामुळे पखचली नाही. उलट तिने अपयशाची कारणे शोधली आणि पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली.अभ्यास करताना मन विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहिली.

त्यामुळे अभ्यासक्रम केंद्रीत करुन अभ्यास केल्यास आणि त्याला सातत्य, संयमाची जोड मिळाल्यास यश हे हमखास मिळतेच हे तिने दाखवून दिले. सुरुवातीला तिची २०१९ मध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी पदी निवड झाली. पण अजून तिने अभ्यास चालू ठेवला. याच जोरावर राज्यसेवा परीक्षेतून तिने तहसीलदार या पदाला गवसणी घातली. एमपीएससीच्या परीक्षेत हे दोनदा मिळालेले यश खरंच कौतुकास्पद आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts