---Advertisement---

परिस्थितीने घडवलं आणि राजश्री बनली पोलिस उपअधिक्षक! वाचा तिच्या यशाची कहाणी..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

राजश्री पाटील-तेरणी ही सामान्य कुटुंबातील लेक.‌ तिने‌ आपल्या आर्थिक स्थितीचा अजिबात बाऊ न करता श्रमप्रतिष्ठा या गोष्टीला प्राधान्य देणाऱ्या या कुटुंबाने स्पर्धा परीक्षा इच्छुकांपुढे श्रमप्रतिष्ठा,संयम, सातत्य, कष्ट यांचे एक सुंदर उदाहरण ठेवले. ती मूळची कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील हिटणी या गावातील आहे.

तिचे वडील हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतात तर आई शिवणकाम…असे असले‌ तरी मुलीने उच्च शिक्षित व्हावे आणि आपले नाव कमवावे असे त्यांना नेहमी वाटतं असे. आपल्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिने बारावी नंतर लवकर नोकरी मिळेल म्हणून डी.एड केले. पण त्यानंतर शिक्षकभरती बंद झाली. शिक्षक होऊन लवकर नोकरी मिळविण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं.

आता काय करावं? हा प्रश्न समोर होता.‌ म्हणून पदवी तर पूर्ण करूयात या उद्देशाने तिने बी.एस्सीला प्रवेश घेतला. पण प्रथम वर्षाला असताना तिचे लग्नही झाले.सासर आणि माहेर या दोन्हीकडचं प्रोत्साहन आणि नोकरीची गरज म्हणून पावलं एमपीएससीकडे वळली. तिने संसारगाडा सांभाळत हा अभ्यास केला आणि जिथे शिक्षक व्हायची इच्छा पूर्ण झाली नाही, त्या शिक्षणाच्या क्षेत्रात उपशिक्षणाधिकारी (Dy. EO) म्हणून निवड झाली. हे पद मिळाल्यावर आणि पहिला पगार आल्यावर सर्वप्रथम काय केलं तर वडिलांचा हॉटेलमधील वेटरचा जॉब बंद केला.

परत तिने प्रयत्न करायचे ठरवले. तिला लहानपणी वर्दीचे देखील आकर्षण होते. म्हणून ती पुन्हा परीक्षेला बसली. स्वतःचे कष्ट आणि सर्वांचे प्रोत्साहन यामुळे २०२१च्या निकालात तिला पोलीस उपअधीक्षक( DySP) हे पद मिळाले.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts