⁠  ⁠

आई – वडील दोघेही निरक्षर, पण लेक बनला पोलीस उपअधिक्षक !

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC Success Story सामान्य कुटुंबातील घरातील प्रत्येक आई – वडिलांची इच्छा असते की घरातील एक तरी मूल हे प्रशासकीय सेवेत जावे. तसेच, उच्च शिक्षण घेऊन गगनभरारी घ्यावी. आई-वडील दोघेही निरक्षर असताना देखील, त्यांनी शिक्षणासाठी दिलेल्या प्रोत्साहनामुळे, प्रेरणा घेऊन जिद्द व चिकाटीच्या जोरावरच पोलीस उपअधिक्षक पदाला गवसणी घातली आहे. त्याच्या आईवडिलांना सतत वाटत असे की आपल्या मुलांनी उच्च दर्जाचे शिक्षण घ्यावे यासाठी त्यांची कितीही कष्ट करण्याची तयारी होती. तसेच सचिन कदम याने करून देखील दाखवले.

त्यांचे वडील रेल्वेत कामाला होते. तर आई शेतीची कामे करत असायची. त्यावरच कुटुंबाचा आर्थिक गाडा चालत असायचा. वडिलांचे थोडेफार शिक्षण झालेले पण आईचे शिक्षण काहीच झाले नव्हते. या दोघांचेही शालेयसोलापूर येथील दयानंद महाविद्यालयातून बारावीचे शिक्षण पूर्ण केले.

त्यानंतर बारामती येथील विद्या विकास प्रतिष्ठानच्या महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.या पदवी शिक्षणाच्या काळात त्याला स्पर्धा परीक्षेबद्दल विशेष आकर्षण वाटू लागले. त्यासाठी त्याने झपाट्याने अभ्यास देखील केला.आधीपासूनच हुशार असल्याने त्याने कॅम्पसमधून आलेल्या आंतरराष्ट्रीय नोकरीसाठी देखील मिळत असताना. ती नोकरी नाकारून स्पर्धा परीक्षा करण्याचा ध्यास उराशी बाळगला.

Share This Article