MPSC Success Story : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करून अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. महाराष्ट्र सरळ सेवा २०२३ मार्फत घेण्यात आलेल्या कृषी सहाय्यक (महाराष्ट्र कृषी विभाग) घेण्यात आलेल्या परीक्षेत यश मिळाले आहे.
सांगोली तालुक्यातील चिंचोली गावात संतोष अर्जुन टकले यांचे बालपण झाले. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चिंचोली एका छोट्या गावात झाले. तर अकरावी व बारावी त्यांनी शिवणे माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज मधून केले. डिग्री डॉ.बुधाजीराव मुळीक कॉलेज ऑफ ॲग्रीकलचर इंजिनियरींग ॲन्ड टेक्नोलोजी मांडकी , ता. चिपळूण येथून केले. डिग्री पूर्ण केल्यावर एमबीए व बी.टेक चे शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर बी.एड देखील महात्मा फुले शिक्षणशास्र महाविद्यालय, सांगोला येथे केले. पुढे एमपीएससी अभ्यास पुण्यात केला. घरची परिस्थिती बिकट असताना देखील त्यांनी शिक्षण चालु ठेवले, आणि यश संपादन केले. एवढेच नाहीतर आता ते मुंबई युनिव्हर्सिटीतून एलएलबी करत आहेत. पुढे, त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. संतोष टकले हे एक राष्ट्रीय खो-खो खेळाडू असुन याची महाराष्ट्र शासनाच्या कृषी सहाय्यक पदी खेळाडू कोट्यातून निवड झाली आहे.