अपयश आले तरी खचली नाही तर लढली ; शारदाचे MPSC च्या परीक्षेत यश!
MPSC Success Story शारदाचे बालपणीचे अधिकारी होण्याचे स्वप्न होते. तसेच तिला आईवडील, आजी- आजोबा यांच्या कष्टाची जाणीव होती. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा मन लावून अभ्यास केला. अभ्यासात सातत्य ठेवले. शारदाची परिस्थिती बेताची होती. शारदा ही मूळची वैजापूर तालुक्यातील जानेफळ येथील शारदा कैलास त्रिभुवन रहिवासी.
तिचे शालेय शिक्षण गावातच झाले. शालेय शिक्षणानंतर पुढील शिक्षण हे वैजापूर येथील कनिष्ठ महाविद्यालयात झाले. यासाठी ती शेतवस्तीपासून दररोज ३ किमी पायी चालत वैजापूरसाठी एसटी बस पकडत असतं. पुढे शारदाला परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात बीएस्सी कृषी क्षेत्रात प्रथम वर्षासाठी प्रवेश मिळाला. मग तिला स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण झाली. पण यात तिला तीन वेळा प्रयत्न करूनही यश आले नाही.त्यानंतरही खचून न जाता बँकिंग व अन्य स्पर्धा परीक्षेची घरातूनच तयारी सुरू ठेवली.
त्यासोबतच तिला लग्नाची तयारी सुरू झाली. तिचा परीक्षा हाच ध्यास होता. बँकिंगच्या परीक्षेत दोन वेळा मुलाखतीपर्यंत जाऊन यश मिळाले नाही. त्यामुळे पुन्हा जोमाने तयारी चालू ठेवली.शारदाचे लग्न जमल्यानंतर हळदीच्या दिवशी २२ जानेवारी २०२४ रोजी तिचा तलाठी भरती परीक्षेचा पहिला निकाल जाहीर झाला. त्यात ती जिल्ह्यातून मुलींमध्ये प्रथम आली. त्यामुळे घरच्यांचा आनंद द्विगुणित झाला. त्यानंतर १६ मार्च रोजी कृषी सहायकपदी तिची निवड झाली.केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेव आयोगाच्या परीक्षांमध्ये यश मिळवून निराळी करण्याची किमया साधली आहे.