MPSC Success Story शेतकरी आणि त्याचे कष्ट हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेतच. पण याही परिस्थितीत जो सामोरे जातो आणि पद मिळवतो. हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी असतो. या संपूर्ण प्रवासात विद्यार्थ्यांनी यात स्वतः न अडकता कुणावरही अवलंबून न राहता. फक्त आणि फक्त स्वतः वर विश्वास ठेवावा. स्वतःला स्वतःची शंभर टक्के खात्री असेल, तर स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. यश नक्कीच मिळते. हे सूरजने दाखवून दिले आहे.
सूरज विठ्ठल वानले याने एमपीएससीतून यश मिळवून थेट सहकार अधिकारी श्रेणी २ या पदाला गवसणी घातली.त्याचे संपूर्ण शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेतून झाले. पुढे विज्ञान शाखेतील पदवीधर असलेल्या सूरजने पदवी परीक्षेनंतरच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. शेतीचे उत्पन्न कमी होत असल्याने सूरजचे वडील विठ्ठल वानले शेतकरी असून, त्यांनी हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. आई गृहिणी आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी जिद्दीने अभ्यास केला तर यश मिळेल या उद्देशाने त्यांनी अभ्यासाला सुरुवात केला.येथील अभ्यासिकेत केलेल्या अभ्यासाच्या जोरावर पुण्यातील यशदा संस्थेची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाला.त्या संस्थेत एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्याचा फायदा त्याला पुढील परीक्षेत झाला. सूरजने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण विभागांतर्गत झालेल्या परीक्षेत लिपिकपद मिळविले होते.
पुढे एमपीएससीतर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेतही वनसेवा परीक्षेच्या मुलाखतीपर्यंत सूरजने मजल मारली होती.पण यात अपयश आले. त्यामुळे त्याने पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरुवात केली.पोलिस उपनिरीक्षकपदाच्या २०२२ व २०२३ च्या मुख्य परीक्षेस पात्र असून, त्याचीही तयारी सूरज करीत आहे. नियमितपणे केलेला अभ्यास व जिद्दीने उभे राहुन कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या पाठिंब्याच्या बळावर सहकार अधिकारीपदी गवसणी घातली आहे. त्याचा हा प्रवास अनेकांसाठी दिशादर्शक ठरणारा आहे.