सात वर्षांचा खडतर प्रवास ; ट्रक ड्रायव्हरचा मुलगा झाला वनपरिक्षेत्र अधिकारी!
MPSC Success Story स्पर्धा परीक्षा म्हटलं की डोळ्यासमोर अनेक प्रश्न, स्वप्नांचा ध्यास आणि अडचणी सोबत असतात. तसेच आर्थिक परिस्थितीवर मात करत विशालने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळवले आहे.विशालचे वडील वडील ट्रक ड्रायव्हर आहेत तर आईने भाजी विकून विशालचे शिक्षण केले.
विशाल सुनील हरिहर हा मूळचा पुण्यातील जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पाटण गावातील रहिवासी. त्याचे शालेय शिक्षण हे मळवली गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण भाजे शांतीदेवी गुप्ता विद्यालय आणि उच्च माध्यमिक शिक्षण व्हीपीएस लोणावळा येथे झाले आहे.
इंजिनिअरिंग शिक्षण झाल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षा देण्याचे ठरवले. त्यासाठी तो गेल्या सात वर्षांपासून अनेक स्पर्धा परीक्षा देत होता. यूपीएसी आणि एमपीएसीच्या परीक्षांचा अभ्यास करत असताना विविध आव्हान आली. काही वेळेस थोड्याच कमी गुणांमुळे यूपीएसीच्या पूर्व परीक्षा आणि एमपीएसीच्या फायनल पोस्ट राहत होत्या. या सगळ्या परिस्थितीत त्याला कुटुंबाने खूप खंबीरपणे साथ दिली.एका भाजी विक्रेत्या महिलेच्या कष्टाचे चीज करत मुलाची वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून निवड झाली आहे. त्याला हे यश मिळाले आहे.