---Advertisement---

जिद्द असावी तर अशी! छोट्या वस्तीतील लेकाची पोलीस उपनिरीक्षक पदी झेप !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Success Story : कोणत्याही परिस्थितीत जिद्दीने उभे राहून स्वप्न पूर्ण करता आली पाहिजेत. तसेच ‌दौंड तालुक्यातील बिरोबावाडी येथील येडे वस्ती राहणारा विशाल ठकाजी पवार. त्याचे शालेय शिक्षण हे जिल्हा परिषद शाळा व दौंड महाविद्यालय येथे शिक्षण झाले आहे. त्याला लहानपणापासूनच वर्दीचे आकर्षण होते. त्यामुळे पोलिस दलात जायचे हे तेव्हाच ठरवले होते.

त्यामुळे त्याने पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. याच दरम्यान पोलिस भरती निघाल्यावर पोलिस पदासाठी अर्ज केला. २०११ मध्ये पुणे शहर पोलिस दलात भरती झाले. जेव्हा भरती झाले तेव्हापासून त्यांचे अधिकारी बनण्याचे स्वप्न होते. त्यानुसार त्यांनी एमपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू‌ केला.

---Advertisement---

पहिल्या प्रयत्नात ते एमपीएससीची फौजदार पदाची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. तसे, नोकरी व अभ्यास सांभाळणे ही तारेवरची कसरत होती. पण त्यांनी करून दाखवले. विशाल पवार यांचे हे गावातील ते पहिले अधिकारी ठरले आहेत. द्विशिक्षकी छोटया शाळेतील महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा (एमपीएससी) उत्तीर्ण झालेले ते चौथे विद्यार्थी आहेत.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts