MSRTC Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात भरती जाहीर करण्यात आली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. या पदांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 11 ऑगस्ट 2025 आहे. इच्छुकांनी सर्वात आधी http://www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचे आहे. एकूण ३६७ पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे.
रिक्त पदाचा तपशील
अभियांत्रिकी पदवीधर, मॅकेनिकस मोटार व्हेईकल, शिटमेटल वर्कर, मॅकेनिक अॅटो इलेक्ट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक्स,वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रीक), पेन्टर, मॅकेनिक डिझेल, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक, मॅकेनिक (रेफिजरेशन अँड एअर कंडिशनिंग),इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर, कारपेंटर या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १४ ते ३० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करायचा आहे.
शैक्षणिक पात्रता काय ?
या नोकरीसाठी ITI/ अभियांत्रिकी पदवीधर/ पदविकाधारक उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. प्रशिक्षणार्थी पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. प्रशिक्षणाचे ठिकाण नाशिक येथे असार आहे.
अर्ज कसा कराल
या भरतीसाठी इच्छुकांनी सर्वात आधी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचे आहे. यानंतर तुम्हाला वेबसाइटवर अर्ज करायचा आहे. शिकाऊ उमेदवारांच्या निवडीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन, विभागीय कार्यालय, एन.डी.पटेल रोड,शिंगाडा तलाव नाशिक येथे तुम्हाला अर्ज नमुना मिळणार आहे. त्यानंतर तो भरुन सबमिट करायचा आहे.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लीक करा







