⁠
Inspirational

दिवसा मजुरी, रात्रभर अभ्यास; अडचणींचा सामना करत सरफराजने मिळवले यश..

कोणतीही परिस्थिती आयुष्यात व्यक्ती यशस्वी होईल की अपयशी हे ठरवत नसते माणसाची जिद्द मेहनत आणि त्यासाठी सातत्याने केलेले प्रयत्न हेच व्यक्तीचे यश ठरवत असते याचेच उत्तम उदाहरण म्हणजे सरफराज.

सर्फराज हा पश्चिम बंगालमधील 21 वर्षीय तरुण आहे ज्याचे स्वप्न होते नीट परीक्षा उत्तीर्ण करून डॉक्टर व्हायचे, परंतु घरची बेताची परिस्थिती असल्याने त्याने यामध्ये यश मिळवण्यासाठी अत्यंत खळतर प्रवास गाठला. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरफराज हा दिवसा मजूर म्हणून काम करून व पूर्ण रात्र अभ्यास, अशी तारेवरची कसरत करत त्याने नीट परीक्षेत 720 पैकी 677 गुण मिळवले आहेत.

हा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्याने अनेक अडचणींचा सामना केला. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने सरफराज आणि कुटुंबीय पीएम आवास योजनेअंतर्गत मिळालेल्या घरात राहतात, त्या घराला छत देखील नाही, थंडी आणि पावसाळ्याच्या दिवसात ते पूर्ण रात्र बसून काढतात. अशी दयनीय परिस्थिती असताना देखील सरफराज याने स्वबळावर त्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.

बाहेर जाऊन कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून शिक्षण घेण्याची परिस्थिती नसल्याने त्याने त्याच्या शिक्षकांकडून फोन घेऊन यूट्यूब वरील व्हिडिओच्या माध्यमातून नीट परीक्षेचा अभ्यास केला व त्यामध्ये यशही प्राप्त केले. सरफराज हा प्रत्येक स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक यशस्वी उदाहरण आहे.

Related Articles

Back to top button