NTPC Green Energy Bharti 2025 : एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये (NTPC) मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १ मे २०२५ निश्चित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण १८२ पदे भरली जातील.
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या
१) अभियंता (आरई-सिव्हिल) – ४० पदे
२) अभियंता (आरई-इलेक्ट्रिकल) – ८० पदे
३) अभियंता (आरई-मेकॅनिकल) – १५ पदे
४) एक्झिक्युटिव्ह (आरई-एचआर) – ७ पदे
५) एक्झिक्युटिव्ह (आरई-फायनान्स) – २६ पदे
६) अभियंता (आरई-आयटी) – ४ पदे
७) अभियंता (आरई-सी अँड एम) – १० पदे
शैक्षणिक पात्रता : अभियंता पदांसाठी उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रात बीई/बी.टेक पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवारांना ३ ते १ वर्षाचा कामाचा अनुभव असावा.(सविस्तर पात्रतेसाठी जाहिरात पाहावी)
वयोमर्यादा : अर्ज करण्यासाठी उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ३० वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
परीक्षा फी :
सामान्य, आर्थिकदृष्ट्या कमकुवत, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ५०० रुपये शुल्क भरावे लागेल.
एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, माजी सैनिक आणि महिला उमेदवारांना अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
पगार : वार्षिक रु. ११,००,०००/-
निवड प्रक्रिया-
उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणी (CBT), अनुभव आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १ मे २०२५
अधिकृत संकेतस्थळ : ngel.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा