MPSC देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. MPSC परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना आता एका वर्षाची मुदत वाढ देण्याचा नित्रनाय राज्य मंत्री मंडळानं घेतला आहे. त्यामुळे MPSC परीक्षेसाठी मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना परत हा मोठा दिलासा असणार आहे. विद्यार्थ्यांना सुरळीतपणे परीक्षा देता यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे राज्यातील सर्व महत्त्वाच्या परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे MPSC ची परीक्षाही (MPSC Exam) रद्द कर्णयुगात आली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला बसण्यापासून मुकणार होते. मात्र अशा विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. MPSC देणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
येत्या 19 नोव्हेंबर रोजी MPSC परीक्षेचा अर्ज भरण्याची शेवटची मुदत असणार आहे. मात्र हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना आता अभ्यासासाठी अजुयन वेळ मिळणार आहे.
दोन वर्ष कोरोनामुळे एमपीएससीच्या. परीक्षा झाल्या नव्हत्या. त्यामुळे वयाची मर्यादा दोन वर्षांनी वाढवावी अशी मागणी होती. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे आता एक वर्ष मुदतवाढ देण्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. यामुळे ज्यांची वयोमर्यादा ओलांडली आहे अशा विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे