⁠  ⁠

आई – वडिलांसाठी खऱ्या सुखाचा दिवस; मनोजचे पोलिस भरती होण्याचे स्वप्न झाले पूर्ण….

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत आणि जिद्द उराशी असेल तर कोणतेही काम अशक्य नाही.पिंगळवाडे येथील मनोज सपकाळे यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती होती. पण त्याच्या घरच्यांनी त्याला पूर्णपणे पाठिंबा दिला. आई सुनीता सपकाळे, वडील राकेश सपकाळे‌ व मोठा भाऊ अजय सपकाळे याने त्याला वेळोवेळी आधार दिला.

त्यामुळे आपण शिक्षण घेऊन काहीतरी करायला हवे‌ ही जिद्द निर्माण झाली..मनोजचे प्राथमिक शिक्षण पिंगळवाडेत, उच्च प्राथमिक शिक्षण मामाच्या गावी अंबापिंप्री (ता. पारोळा) येथे, त्यानंतर माध्यमिक शिक्षण निंभोरा येथील शाळेत तर बारावीपर्यंतचे शिक्षण अमळगाव येथील आदर्श हायस्कूल येथे पूर्ण केले. तसेच पदवी व पदव्युत्तर शिक्षण एमए (राज्यशास्त्र) प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे पूर्ण केले. त्यानंतर त्याने गावातील अभ्यासिकेतून अभ्यास केला.पोलिस भरतीसाठी ‘ग्राऊंड’ची तयारी म्हणून अमळनेर तालुका क्रीडा संकुलच्या रनिंग ट्रॅकवर न चुकता सराव देखील केला. पण यात अपयश आले.

पण त्याने प्रयत्न चालू ठेवले‌ मुंबई पोलिस शिपाई (चालक) भरती २०२१ च्या प्रतीक्षा यादीतील ८२ उमेदवारांचा समावेश अंतिम निवड यादीत झाल्याने मनोजच्या मेहनतीला व जिद्दीला उशिरा का होईना पण फळ मिळाले.पण त्याने प्रयत्न चालू ठेवले‌ मुंबई पोलिस शिपाई (चालक) भरती २०२१ च्या प्रतीक्षा यादीतील ८२ उमेदवारांचा समावेश अंतिम निवड यादीत झाल्याने मनोजच्या मेहनतीला व जिद्दीला उशिरा का होईना पण फळ मिळाले..

Share This Article