सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे राज्य सरकार लवकरच येत्या काही महिन्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागात तब्बल 10,127 जागांसाठी मेगाभरती होणार आहे. याबाबतची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.यामुळे जे विद्यार्थी वर्षानुवर्षे आरोग्य विभागाच्या परीक्षांसाठी किंवा सरकारी नोकरीसाठी वाट बघत आहेत अशा उमेवारांना या भरतीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, लॅब टेक्निशियन अशा अनेक पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे अशी माहिती महाजन यांनी दिली आहे. या पदभरती संदर्भातील ऑफिशिअल नोटिफिकेशन लवकरच जरी करण्यात येणार आहे अशीही माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
या पदभरती संदर्भातील काही महत्त्वाच्या तारखा
पदभरतीच्या एकूण जागा – 10,127
ऑफिशिअल नोटिफिकेशन जारी होण्याचा कालावधी – 01 जानेवारी 2023 – 07 जानेवारी 2023
परीक्षांची तारीख – 25 मार्च 2023 आणि 26 मार्च 2023
निकाल जाहीर होण्याचा कालावधी -27 मार्च ते 27 एप्रिल 2023